भारत की संस्कृति के लिए... भाषा की उन्नति के लिए... साहित्य के प्रसार के लिए

Changes

Kavita Kosh से
यहाँ जाएँ: भ्रमण, खोज
1.
कारल्याच बी पेर ग सुने, मग जा आपुल्या माहेरा,
कारल्याच बी पेरल सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा॥
कारल्याच उष्ट काढ ग सुने मग जा आपुल्या माहेरा॥
कारल्याची उष्ट काढल सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा॥  2.कारलीच बी पेर ग सूनबाईमग जा आपल्या माहेरा माहेरा कारल्याच बी पेरल हो सासूबाई आता तरी धाडाना, धाडाना कारल्याला पाणी घाल ग सूनबाईमग जा आपल्या माहेरा, माहेरा कारल्याला पाणी घातल हो सासूबाई आता तरी धाडाना, धाडाना कारल्याला बूड येऊ देग सूनबाईमग जा आपल्या माहेरा, माहेरा कारल्याला बूड आल हो सासूबाई आता तरी धाडाना, धाडाना  कारल्याला मांडव घाल ग सूनबाई मग जा आपल्या माहेरा, माहेरा  कारल्याला मांडव घातला हो सासूबाई आता तरी धाडाना, धाडाना कारल्याला फूल येऊ दे ग सूनबाई मग जा आपल्या माहेरा, माहेरा कारल्याला फूल आल हो सासूबाई आता तरी धाडाना, धाडाना कारल्याला कारल लागू दे ग सूनबाई मग जा आपल्या माहेरा, माहेरा कारल्याला कारल लागल हो सासूबाई आता तरी धाडाना, धाडाना कारल्याची भाजी कर ग सूनबाई मग जा आपल्या माहेरा, माहेरा कारल्याची भाजी केली हो सासूबाई आता तरी धाडाना, धाडाना कारल्याची भाजी खा ग सूनबाई मग जा आपल्या माहेरा, माहेरा कारल्याची भाजी खाल्ली हो सासूबाईआता तरी धाडाना, धाडाना भाजीचा गंज घास ग सूनबाई मग जा आपल्या माहेरा, माहेरा भाजीचा गंज घासला हो सासूबाई आता तरी धाडाना, धाडाना सासूबाई सासूबाई आता तरी धाडानामला काय पुसते पूस जा आपल्या सासर्‍याला मांमाजी मांमाजी आता तरी धाडाना, धाडानामला काय पुसतेस पूस जा आपल्या दिराला भाऊजी भाऊजी आता तरी धाडाना, धाडानामला काय पुसतेस पूस जा आपल्या जावेला जाऊबाई जाऊबाई आता तरी धाडाना, धाडाना मला काय पुसतेस पूस जा आपल्या नंणदेला वन्स वन्स आता तरी धाडाना, धाडाना मला काय पुसतेस पूस जा आपल्या पतीला पतिराज पतिराज आता तरी धाडाना, धाडानाघेतळी चोळी लावली पाठी जाऊन बसली नदीच्या काठी
www.khapre.org से प्रतिबिम्बित