भारत की संस्कृति के लिए... भाषा की उन्नति के लिए... साहित्य के प्रसार के लिए

झिम्मा

Kavita Kosh से
Vandana deshpande (चर्चा | योगदान) द्वारा परिवर्तित 21:51, 25 अक्टूबर 2010 का अवतरण (नया पृष्ठ: रुणझूण पाखरा जा माझ्या माहिरा ।हू हू॥ तिथ घराचा दरवाजा । चंदनी ल…)

(अंतर) ← पुराना अवतरण | वर्तमान अवतरण (अंतर) | नया अवतरण → (अंतर)
यहाँ जाएँ: भ्रमण, खोज

रुणझूण पाखरा जा माझ्या माहिरा ।हू हू॥

तिथ घराचा दरवाजा । चंदनी लाकडाचा

पेशवाई थाटाचा ।त्यावरी बैस जा ॥हू हू॥

माझ्या माहिरा अंगणी ।बघ फुलली निंबोणी

गोडी दारात पुरवणी ।त्यावरी बैस जा ।हू हू॥

माझ्या माहिरीचा ।त्यावरी बैस जा।हू हू॥

माझ्या माहिरीचा ।झोपाळा आल्याड बांधियला

फुलांनी गुंफियला ।त्यावरी बैस जा ।हू हू॥

माझ्या माहिरी मायबाई ।डोळे लावुनी वाट पाही

तिला खुशाली सांगाया जा ।माझ्या माहिरी पाखरा जा ।हू हू॥

www.khapre.org से प्रतिबिम्बित