केशवाचें ध्यान धरूनि अंतरीं।
मृत्तिके माझारीं नाचतसे॥ १॥
विठ्ठलाचें नाम स्मरे वेळोवेळ।
नेत्रीं वाहे जळ सद्गसदीत॥ २॥
कुलालाचे वंशीं जन्मलें शरीर।
तो गोरा कुंभार हरिभक्त॥ ३॥
केशवाचें ध्यान धरूनि अंतरीं।
मृत्तिके माझारीं नाचतसे॥ १॥
विठ्ठलाचें नाम स्मरे वेळोवेळ।
नेत्रीं वाहे जळ सद्गसदीत॥ २॥
कुलालाचे वंशीं जन्मलें शरीर।
तो गोरा कुंभार हरिभक्त॥ ३॥