Last modified on 1 जून 2014, at 01:21

केशवाचे भेटी लागलें पिसें / गोरा कुंभार

केशवाचे भेटी लागलें पिसें। विसरलें कैसें देहभान॥ १॥
झाली झडपणी झाली झडपणी। संचरलें मनीं आधीं रूप॥ २॥
न लिंपेची कर्मीं न लिंपेची धर्मी। न लिंपे गुणधर्मी पुण्यपापा॥ ३॥
म्हणे गोरा कुंभार सहज जीवन्मुक्त। सुखरूप अद्वैत नामदेव॥ ४॥