Last modified on 1 जून 2014, at 01:23

देवा तुझा मी कुंभार / गोरा कुंभार

देवा तुझा मी कुंभार। नासीं पापाचें डोंगर॥ १॥
ऐशा संतप्ते हो जाती। घडे साधूची संगती॥ २॥
पूर्ण कृपा भगवंताची। गोरा कुंभार मागे हेंचि॥ ३॥