Last modified on 1 जून 2014, at 01:18

मुकिया साखर चाखाया दिधली / गोरा कुंभार

मुकिया साखर चाखाया दिधली। बोलतं हे बोली बोलवेना॥ १॥
तो काय शब्द खुंटला अनुवाद। आपुला आनंद आधाराया॥ २॥
आनंदी आनंद गिळूनि राहणें। अखंडित होणें न होतिया॥ ३॥
म्हणे गोरा कुंभार जीवन्मुक्त होणें। जग हें करणें शहाणें बापा॥ ४॥