Changes

लग्नाची गाणी / विहीण

1,193 bytes removed, 11:59, 26 अक्टूबर 2010
बंधु लावा वो वर भिंग
२.
आंदण देई रे भाऊराया काय देऊ ग बहिणी बया
वासरासहित पाची गया आंदण देई रे भाऊराया
काय देऊ ग बहिणी बया ऊसा सहित पानमळा
आंदण देई रे भाऊराया बहिण परास लेकीची माया
आंदण देई रे भाऊराया
४. पहात होते चंद्राला पदर माझ्या कमरेला बंधु आल्याती नियाला रजा द्या मला जायाला मी नाय रजा दियाचा खारक्या बदाम्या लावायचा खारकात खारका तोडीन बैलाला काढून नेईन चल ग मैना झपझप शाळू दिवस कानाडा कशी मी चालू दादाजी पायातल पैजण गळतय जी गळतय तर गळू दे करुन आणीन हीनाच घडवून घालीन चांदीच2.
अहो अहो विहीणबाई
 
आमचे मागणे काही नाही
 
आमचे मागणे थोडे थोडे
 
नवर्या मुलीला पैंजणतोडे
पैंजण जोडव्यांची हौस फार
 
नवर्या मुलीला चद्रहार
चंद्रहाराची हौस मोठी
 
नवर्या मुलीला चिंचपेटी
चिंचपेटीला मोती थोडे
 
नवर्या मुलीला हत्तीघोडे
हत्तीघोडयावर बसती
 
गावाकडे दोघे जाती
 
आई पाहते खिडकीतून
 
बाप पाहतो दारातून
 
भाऊ पहातो ओटयावरुन
 
हरणी गेली कडल्यातून
 
ज्याची होती त्यान नेली
 
आमची माया वाया गेली
3
विहीणबाई, विहीणबाई, राग मनातला सोडा
गोरी गोरी वरमाय
 
तिचे नाजुक पिवळे पाय
 
गव्हा तांदळान भरल्या कोठया
 
खोबर्या नारळान मी भरीते ओटया
 
खणा नारळान मी भरीते ओटया
 
विहीणबाई राग मनातला सोडा
 
जेवण झाल्यावर हात चोळते साखरीन
 
दात कोरते लवंगान
 
घंगाळी रुपये तुम्ही घाला
 
विहीणबाई राग मनातला सोडा
 
रेशमी पायघडयावरुन मिरवा
 
विहीणबाई राग मनातला सोडा
 
मोठया लोकांचा नवरदेव सासरी रुसला
 
कंठी गोफासाठी जानोसी बसला
 
नवरदेवाच्या जोरावर सवाष्णी मागती जानोसा
 
चिरेबंदी वाडा त्यात जोडीनी हो बसा