Last modified on 1 जून 2014, at 01:17

कैसें बोलणें कैसें चालणें / गोरा कुंभार

कैसें बोलणें कैसें चालणें। परब्रह्मीं राहणें अरे नामा॥ १॥
जेवी त्याची खूण वाढितांचि जाणे। येरा लाजिरवाणें अरे नामा॥ २॥
म्हणे गोरा कुंभार अनुभवित जाणे। आम्हांतें राशी राहाणें असे नामा॥ ३॥