Last modified on 1 जून 2014, at 01:15

वरती करा कर दोन्ही / गोरा कुंभार

वरती करा कर दोन्ही। पताकाचे अनुसंधानीं॥ १॥
सर्व हस्त करिती वरी। गोरा लाजला अंतरीं॥ २॥
नामा म्हणे गोरोबासी। वरती करावें हस्तासी॥ ३॥
गोरा थोटा वरती करी। हस्त फुटले वरचेवरी॥ ४॥