भारत की संस्कृति के लिए... भाषा की उन्नति के लिए... साहित्य के प्रसार के लिए

"आगगाडी आणि जमीन / कुसुमाग्रज" के अवतरणों में अंतर

Kavita Kosh से
यहाँ जाएँ: भ्रमण, खोज
(नया पृष्ठ: {{KKGlobal}} {{KKAnooditRachna |रचनाकार= कुसुमाग्रज |संग्रह= }} Category:मराठी भाषा <poem> नको…)
 
(कोई अंतर नहीं)

21:56, 17 दिसम्बर 2010 के समय का अवतरण

मुखपृष्ठ  » रचनाकारों की सूची  » रचनाकार: कुसुमाग्रज  » आगगाडी आणि जमीन

नको ग !नको ग!!
आक्रंदे जमीन
पायाशी लोळत
विनवी नमून

धावसी मजेत
वेगात वरून
आणिक खाली मी
चालले चुरून !

छातीत पाडसी
कितीक खिंडारे
कितीक ढाळसी
वरून निखारे !

नको ग !नको ग!!
आक्रंदे जमीन
जाळीत जाऊ तू
बेभान होऊन !

ढगात धुराचा
फवारा सोडून
गर्जत गाडी ती
बोलली माजून -

दुर्बळ! अशीच
खुशाल ओरड
जगावे जगात
कशाला भेकड

पोलादी टाचा या
छातीत रोवून
अशीच चेंदत
धावेन !धावेन !

चला रे चक्रानो ,
फिरत गरारा
गर्जत पुकारा
आपुला दरारा !

शीळ अन कर्कश
गर्वात फुंकून
पोटात जळते
इंधन घालून

शिरली घाटात
अफाट वेगात
मैलाचे अंतर
घोटात गिळीत !

उद्दाम गाडीचे
ऐकून वचन
क्रोधात इकडे
थरारे जमीन

"दुर्बळ भेकड !
त्वेषाने पुकारी
घुमले पहाड
घुमल्या कपारी!

हवेत पेटला
सूडाचा घुमारा
कोसळे दरीत
पुलाचा डोलारा

उठला क्षणार्ध
भयाण आक्रोश
हादरे जंगल
कापले आकाश !

उलटी पालटी
होऊन गाडी ती
हजार शकले
पडली खालती !